Akshata Chhatre
गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात लवकरच एक ऐतिहासिक क्षण नोंदवला जाणार आहे.
या मठाच्या ५५० वर्षांच्या पूर्ती सोहळ्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आशियातील सर्वात उंच, ७७ फुटी कांस्य धातूची भगवान श्रीरामाची मूर्ती अनावरण करणार आहेत.
कणकोण येथे असलेल्या या प्राचीन मठाने धर्म-पंथांपलीकडे जाऊन जगभरात आदर मिळवला आहे.
या अभूतपूर्व ११-दिवसीय 'सार्ध पंचशतामहोत्सवा' मध्ये पंतप्रधान मोदी टपाल तिकीट आणि स्मृती नाणे देखील जारी करणार आहेत.
येथे रामायण थीम पार्क आणि १०,००० चौ. फूट क्षेत्रफळाचे संग्रहालय देखील उभारले जात आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव दक्षिण गोव्यातील मठाच्या २ किमी परिसरात ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.