Arshdeep Singh: अर्शदीपनं पुन्हा रचला इतिहास, टी-20 मधील जिंकला सर्वात मोठा पुरस्कार

Manish Jadhav

टी-20 आय क्रिकेटर

आयसीसीने 2024 मधील मेन्स टी-20 आय क्रिकेटरचे नाव जाहीर केले आहे. या पुरस्कारासाठी 4 खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली होती.

Arshdeep Singh | Dainik Gomantak

स्टार खेळाडूंमध्ये स्पर्धा

यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा धाकड ट्रॅव्हिस हेड आणि झिम्बाब्वेचा सिंकर रझा यांचा समावेश होता.

Arshdeep Singh | Dainik Gomantak

पुरस्कार जिंकला

दरम्यान, या सगळ्यांना पछाडत अर्शदीपने हा पुरस्कार जिंकला. सध्या इंग्लडविरुद्धच्या टी-20 मालिकेत अर्शदीपचा जलवा पाहायला मिळत आहे.

Arshdeep Singh | Dainik Gomantak

सर्वाधिक विकेट्स

गेल्या वर्षी त्याने टीम इंडियासाठी 18 टी-20 सामने खेळले, ज्यामध्ये 36 विकेट्स घेतल्या. 2024 मध्ये अर्शदीप भारताकडून टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.

Arshdeep Singh | Dainik Gomantak

घातक गोलंदाज

गेल्या काही वर्षांत अर्शदीप टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वात घातक गोलंदाज बनला आहे.

Arshdeep Singh | Dainik Gomantak

पदार्पण

अर्शदीपने नोव्हेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने अवघ्या दोन वर्षात टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला.

Arshdeep Singh | Dainik Gomantak

97 विकेट्स

त्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी टी-20 मध्ये 97 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या तुलनेत, कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतक्या विकेट घेता आल्या नाहीत. यापूर्वी हा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर होता.

Arshdeep Singh | Dainik Gomantak
Yudhvir Singh | Dainik Gomantak
आणखी बघा