Akshata Chhatre
फेसवॉश लावण्यापूर्वी चेहरा साध्या पाण्याने ओला करा. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि फेसवॉश सर्वत्र समप्रमाणात पसरतो.
फेसवॉश चेहऱ्यावर लावल्यानंतर काही मिनिटे हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. जोरात घासल्याने त्वचेला सूज किंवा लालसरपणा येऊ शकतो.
चेहरा धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. हिवाळ्यात पाणी वापरायचे असल्यास ते केवळ 'कोमट' असावे, अति गरम पाणी पेशींना हानी पोहोचवते.
चेहरा पुसण्यासाठी नेहमीच्या टॉवेलऐवजी 'पेपर टॉवेल' किंवा 'टिश्यू' वापरा. यामुळे बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
तुमच्या स्किन टोन आणि प्रकारानुसारच (ऑइली/ड्राय) फेसवॉश निवडा. चुकीचा फेसवॉश त्वचेचे पीएच संतुलन बिघडवू शकतो.
फेसवॉशचा अतिवापर किंवा जोरात घासणे त्वचेचा नैसर्गिक ओलावा हिरावून घेते, ज्यामुळे अकाली सुरकुत्या येऊ शकतात.
या ४ सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास तुमची त्वचा खोलवर स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येईल.