Sameer Amunekar
तुमच्या मित्राला किंवा कुटुंबातील एखाद्याला तुमच्याबद्दल एखादी धक्कादायक बातमी सांगणारा फेक चॅट स्क्रीनशॉट बनवा. उदा."अरे, मला बॉलिवूडमध्ये रोल मिळालाय!", "मी लवकरच परदेशात शिफ्ट होतोय!", त्यांची रिअॅक्शन बघायला मजा येईल!
एखाद्याचा फोन घेऊन त्यात क्रॅश झाल्यासारखा फेक लॉक स्क्रीनसेव्हर लावा. उदा. – "Your phone has been hacked!" किंवा "System Failure!"
रेस्टॉरंटमध्ये बोलवा
संबंधित व्यक्तीला फोन करून पार्टीच्या नावाने रेस्टॉरंट, हॉटेल, पार्कमध्ये यायला सांगा. तुम्ही तिथं जाऊच नका. नंतर फोन करून त्याला एप्रिल फूल म्हणा.
एका मित्राच्या नावाने फेक बॉलिवूड किंवा क्रिकेट न्यूज तयार करा, "XYZ चा सिलेक्शन IPL टीममध्ये झाला!" "XYZ च्या नवीन गाण्याला 1 मिलियन व्ह्यूज आले!" तो हे खोटं सिद्ध करेपर्यंत बाकी लोक त्याला अभिनंदन देत राहतील
तुमच्या टीमला किंवा मित्रांना सांगा की "आज बॉस / प्रोफेसर चिडलेत, त्यामुळे सगळे शांत बसा आणि हसायचं नाही!" – अनपेक्षित शांतता त्यांनाच संशयास्पद वाटेल.
कोणाला तरी मेल पाठवा की "तुमच्या नावाने मोठी लॉटरी लागली आहे, कृपया त्वरित संपर्क साधा!" किंवा "तुमची इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाईड होत आहे!