Akshata Chhatre
वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर प्रत्येक स्त्रीला चेहऱ्यावर सुरकुत्या, तेज कमी होणं, डाग-धब्बे, तेलकटपणा आणि कोरडेपणा असे बदल जाणवू लागतात.
या लक्षणांमुळे आपण महागड्या फेशियल्स, क्रीम्स किंवा ट्रीटमेंट्सकडे धाव घेतो. पण एक सोपा घरगुती उपाय तुरटी, तुमचं सौंदर्य पुन्हा खुलवू शकतो.
तुरटी सामान्यतः शेव्हिंगनंतर वापरली जाते, पण तिचा वापर महिलांसाठीही तितकाच फायदेशीर आहे. विशेषतः चाळिशीनंतर त्वचेला ताजेपणा देण्यासाठी तुरटी उपयुक्त ठरते.
स्किनकेअरमध्ये तुरटीच्या पाण्याचा समावेश केल्यास चेहरा तजेलदार आणि तरुण दिसू लागतो.
वय वाढल्यानं त्वचेला लवचिकता कमी होते. तुरटीमधील नैसर्गिक घटक त्वचेचं टोनिंग करतात.
चेहरा फ्रेश, टवटवीत आणि अधिक तरुण दिसतो.
तुरटीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटीसेप्टिक घटक त्वचेला स्वच्छ करतात. यामुळे पिंपल्सचे डाग, काळे डाग आणि पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते.