Ashutosh Masgaunde
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट खूपच रंजक होती. 2013 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान सेटवर दोघांची भेट झाली होती.
विराटने 2014 मध्ये मेलबर्नमध्ये शतक झळकावले होते. हा सामना पाहण्यासाठी अनुष्काही आली होती. शतक पूर्ण केल्यानंतर विराटने स्टेडियममध्ये उपस्थित अनुष्काला फ्लाइंग किस दिला होता.
11 डिसेंबर 2017 रोजी विराट आणि अनुष्काचे लग्न झाले. विरुष्काचे जिथे लग्न झाले ते ईटलीतील रिसॉर्ट खास तिच्यासाठी डिसेंबरमध्ये उघडण्यात आले होते. अन्यथा हा रिसॉर्ट नेहमी एप्रिलमध्ये उघडते.
लग्नासाठी केवळ 50 खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. एका व्यक्तीच्या इथे आठवडाभर राहण्याचा खर्च सुमारे एक कोटी रुपये आहे. त्यानुसार विराट आणि अनुष्काच्या लग्नासाठी पाहुण्यांच्या होस्टिंगसाठी 45-50 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
विरुष्का या नावाने प्रसिद्ध असलेली विराट-अनुष्काची जोडी कमाईच्या बाबतीत खूप पुढे आहे. जीक्यू इंडिया मॅगझिननुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती 900 कोटी रुपये आहे. तर अनुष्का शर्माची संपत्ती अंदाजे 350 कोटी रुपये आहे.
विराट आणि आनुष्का 2021 मध्ये एका मुलीचे पालक झाले. त्यांनी मुलीचे नाव वामिका असे ठवले आहे.
विराट-अनुष्का जोडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे दोघेही एकमेकांच्या पाठीशी उभे राहून एकमेकांना पूर्ण साथ देताना दिसतात. विराटच्या खराब कामगिरीमुळे अनुष्काला ट्रोल केले जाते तेव्हा विराटने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.