Akshata Chhatre
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याबद्दल आणि त्याला मिळालेल्या नावांबद्दल खूप मनोरंजक किस्से आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
त्याने नुकताच कसोटी क्रिकेटमधून आणि T20 विश्वचषक २०२४ च्या विजयानंतर T20 फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेतली आहे.
पण तुम्हाला माहितीये का विराटला फक्त चिकू म्हणून नाही, तर काही वेगवेगळ्या आणि रंजक नावांनी चाहते ओळखतात.
विराट कोहलीची मैदानाबाहेरची लक्झरी लाईफस्टाईल, कोट्यवधींची मालमत्ता आणि आलिशान गाड्या यांमुळे चाहते त्याला 'द किंग' म्हणून ओळखतात.
त्याचे अविश्वसनीय रेकॉर्ड, मोठी कामगिरी आणि मॅच जिंकून देण्याची क्षमता यामुळे चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ त्याला 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT) हे नाव देतात.
एकेकाळी विराटच्या बॅटमधून सातत्याने शतके आणि अर्धशतके येत होती. त्याच्या या सातत्यामुळे त्याला 'रन मशीन' हे नाव मिळाले.