Manish Jadhav
पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आणि गोवन वंशाचे अतानियो कोस्टा सध्या चर्चेत आहेत.
पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अतानियो कोस्टा यांची युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
अतानियो कोस्टा हे गोवन वंशाचे आहेत. गोव्यातील लेखक ओरलँडो दा कोस्टा यांचे ते पुत्र आहेत. कोस्टा हे तिसऱ्यांदा पोर्तुगाल पंतप्रधान बनले होते. 2015 पासून ते या पदावर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोस्टा यांचे अभिनंदन केले.
भारत-EU धोरणात्मक भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी मी त्यांच्यासोबत (कोस्टा) काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
युरोपियन कौन्सिलची कमान कोणाकडे सोपवायची या संदर्भात अलीकडेच ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियनच्या नेत्यांची बैठक झाली. अध्यक्षपदाचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो.
इटली आणि हंगेरीच्या नेत्यांनी कोस्टा यांच्या निवडीला विरोध केला होता.
नवीन भूमिका स्वीकारताना कोस्टा म्हणाले की, 'युरोपियन कौन्सिलच्या नव्या अध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे. मी समाजवादी समर्थकांचे आणि पोर्तुगीज सरकारचे आभार मानतो.'