Manish Jadhav
सीनेसृष्टीचे बादशाह अमिताब बच्चन यांना आपण त्यांच्या शानदार अभिनयासाठी तर ओळखतोच पण ते अनेकदा सढळ हाताने मदत करतानाही दिसतात. त्यांचाच कित्ता त्यांची नात नव्या नवेली नंदाने गिरवला आहे.
अमिताभ बच्चन यांची नातीने सामाजिक कार्यात आपली छाप पाडायला सुरुवात केली आहे.
नव्या आधीच एका एनजीओशी जोडलेली आहे. ती एनजीओच्या माध्यमातून अनेक समाजउपयोगी काम करते. नव्याने आता महिलांसाठी मोठं काम करण्याचा निर्णय घेतलाय.
नव्याने सम्यक चक्रवर्ती फाऊंडेशनशी हातमिळवणी करुन स्मार्ट फेलोशिप सुरु केली.
स्मार्ट फेलोशिपच्या मदतीने महिलांना विशेष कौशल्ये शिकवली जाणार आहेत. या माध्यमातून 1000 महिलांना प्रशिक्षित करुन त्यांना रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
या फेलोशिपबद्दल बोलताना नव्या म्हणाली की, 'आम्ही या प्रोजेक्टच्या निमित्ताने लखनऊला आलो आहोत. याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. मी खूप वर्षांनी लखनऊला आले आहे. येथील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.'
देशातील महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार देण्याचा आमचा मानस आहे, असं नव्या म्हणाली.