Glowing Skin Care Tips: "40 शी मध्ये दिसेल विशीसारखा चार्म!" आहारात आजच समाविष्ट करा 'हे' 7 सुपरफूड्स; त्वचा कायम राहील चिरतरुण

Manish Jadhav

पालक

पालकमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे त्वचेतील कोलॅजन वाढवून सुरकुत्या कमी करतात. रोजच्या आहारात पालकाचा समावेश केल्याने त्वचेचा कस टिकून राहतो.

Spinach | Dainik Gomantak

एवोकॅडो

एवोकॅडोमधील हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचेला आतून मॉइश्चराइझ ठेवून तिचा कोरडेपणा दूर करतात. यामुळे त्वचा दीर्घकाळ मऊ, लवचिक आणि तजेलदार दिसते.

avocados | Dainik Gomantak

अक्रोड आणि बदाम

अक्रोडमधील ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि बदामामधील व्हिटॅमिन ई त्वचेच्या पेशींचे पुनरुज्जीवन करतात. हे सुके मेवे नियमित खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

nuts | Dainik Gomantak

डाळिंब

डाळिंबामधील शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करतात. डाळिंबाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्याचा निखार वाढतो.

Pomegranate | Dainik Gomantak

स्ट्रॉबेरी/ब्ल्यूबेरी

बेरीजमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण उच्च असते, जे त्वचेचा पोत सुधारुन ती घट्ट ठेवण्यास मदत करते. हे फळ त्वचेवरील वाढत्या वयाच्या खुणा रोखण्यासाठी उत्तम मानले जाते.

Berries | Dainik Gomantak

ग्रीन टी

ग्रीन टीमधील कॅटेचिन घटक त्वचेची जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात. रोज ग्रीन टी प्यायल्याने त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात आणि चेहरा फ्रेश दिसतो.

Green Tea | Dainik Gomantak

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमधील फ्लेव्हनॉईड्स त्वचेतील रक्ताभिसरण वाढवून तिला हायड्रेटेड ठेवतात. मर्यादित प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने त्वचेची लवचिकता कायम राहते.

Dark Chocolate | Dainik Gomantak

Pratapgad Fort: "जिथे रक्ताचे सडे सांडले!" प्रतापगडाच्या 'रक्तपेढी'चा थरारक अन् रंजक इतिहास; आदिलशाही सैन्याची उडवली दाणादाण

आणखी बघा