Akshay Nirmale
या चित्रपटाने 7 दिवसांत 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यापैकी एकट्या भारतात या चित्रपटाने 350 कोटींची कमाई केली आहे.
तृप्तीने या चित्रपटात तृप्तीने रणबीर कपूरसोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत. या दृश्यांमुळे हा चित्रपटही चर्चेत आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिच्यासाठी हा चित्रपट खूपच लकी ठरला आहे. अॅनिमल या चित्रपटानंतर तृप्तीचे स्टारडम वाढले आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरीने 6 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती जेवढी प्रसिद्धी तिला अॅनिमल चित्रपटातील भूमिकेने मिळवून दिली.
एवढेच नाही तर सोशल मीडियावर तृप्ती डिमरीच्या फॉलोअर्समध्ये तब्बल ३२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणि ही वाढ दिवसेंदिवस सुरूच आहे.
इंस्टाग्रामवर तृप्तीचे ६ लाख फॉलोअर्स होते.
पण अॅनिमल या चित्रपटानंतर तृप्तीच्या फॉलोअर्सचा आकडा 20 लाखांच्या पुढे गेला आहे. ही वाढ सुमारे ३२० टक्के इतकी जास्त आहे.