Sameer Panditrao
एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते.
आज आपण त्यांच्या मूळ घराची माहिती घेऊ.
लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी शहरात झाला.
ते शालेय शिक्षण घेत असताना या रत्नागिरीच्या घरात रहात होते.
त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत ते इथेच असल्याच्या नोंदी आहेत.
ते घर संरक्षित असून आजही पाहता येते.
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटक गेले की या जागेला नक्की भेट देतात.