गोमन्तक डिजिटल टीम
नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका यांचा शाही विवाह संपन्न झाला. या लग्नातील संगीत सोहळा, मेजवानीतले विविध पदार्थ, रोषणाई या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली.
या विवाह सोहळ्यातील पदार्थांची खूप चर्चा झाली. सोशल मिडियावर या शाही मेजवानीच्या मेन्यूचे फोटो धुमाकूळ घालत होते.
या कार्यक्रमात विविध प्रकारचे आईस्क्रीम आणि डेझर्टस होते जे उत्तम दर्जाचे होते. पण यात एक गोवन टचचे खास डेझर्ट होते हे तुम्हाला माहिती आहे का?
याला बेस्ट ऑफ द बेस्ट अर्थात सर्वोत्तम क्रीम डेझर्ट म्हणतात यावरून याला क्रीम दे ला क्रीम असे नाव पडले आहे.
गोव्यातील दिवाडी बेटावरील इटली पेस्ट्री क्वीन पुरस्कार विजेती शेफ युरेका अराउजो हीने या शाही सोहळ्यासाठी हे खास डेझर्टस बनवले होते.
तिची बहीण निकितासुद्धा तिला या कामात मदत करते. जी स्वत: अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवते.
या दोघी बहीणींनी मिळून एक डेझर्ट शॉप सुरू केले आहे जिथे डेझर्टस आणि पेस्ट्रीज मधल्या अनेक व्हरायटी चाखता येतात.
'बंगळुरू ते गोवा' एक अद्भुत सफर