Sameer Panditrao
प्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि अमिताभ-जया बच्चन स्टारर 'जंजीर' सिनेमा 11 मे 1973 रोजी रिलीज झाला होता.
या सिनेमाची कथा सलीम जावेद यांनी लिहिली होती.
पण तुम्हाला माहिती आहे का या सिनेमासाठी अमिताभ बच्चन नायक म्हणून पहिली पसंती न्हवते.
धर्मेंद्र यांनी या सिनेमाची कथा आवडली होती, पण काही कारणाने ते या प्रोजेक्टचा भाग न्हवते.
देव आनंद यांनी जंजीर सिनेमा नायकाला गाणे नाही या कारणास्तव सोडला.
अशाच प्रकारे राजेश खन्ना, राज कुमार, दिलीप कुमार यांनीही हा सिनेमा केला नाही.
सरतेशेवटी नवोदित अमिताभ बच्चन यांच्या गळ्यात ही माळ पडली, सिनेमा सुपरहिट झाला आणि बच्चन अँग्री यंग मॅन म्हणून प्रसिद्ध झाले.