Manish Jadhav
डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (20 जानेवारी रोजी) अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील आणि जगातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात.
आज (20 जानेवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमाचतून डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून मिळणाऱ्या सोयी-सुविधांविषयी जाणून घेणार आहोत.
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दरवर्षी 4.4 लाख डॉलर्स (भारतीय रुपयात हे 3 कोटी 80 लाख 58 हजार 958 भारतीय रुपये) दिले जातात.
याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना 50 हजार डॉलर्स (तब्बल 43 लाख रुपये) खर्च भत्ताही मिळतो.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मनोरंजन, कर्मचारी आणि स्वयंपाकासाठी दरवर्षी 19 हजार डॉलर (सुमारे 16 लाख रुपये) मिळतात.
व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना एक लाख डॉलर (सुमारे 86 लाख रुपये) मिळतात.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सर्व आरोग्य सेवा मोफत आहेत. याशिवाय, प्रवासासाठी एक लिमोझिन कार, एक सागरी हेलिकॉप्टर आणि एअर फोर्स वन नावाचे विमान देखील दिले जाते.