Sameer Amunekar
नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान आंबोलीमध्ये दाट धुक्याच्या चादरीत हरवलेले डोंगर, झाडांची हिरवीगार रांग आणि थंडगार वाऱ्याचा गारवा अनुभवायला मिळतो
सह्याद्रीच्या पश्चिम घाटात वसलेलं हे ठिकाण वर्षभर हिरवेगार असते. दरी, डोंगर, पावसानंतर धबधबे आणि पक्ष्यांचा किलबिलाट निसर्गप्रेमींची मनं जिंकतो.
महादेवगड पॉइंट, sunset point अशी अनेक ठिकाणं हिवाळ्यात धुक्याच्या पडद्यामधून दिसणाऱ्या अप्रतिम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
मुख्य आंबोली वॉटरफॉल हिवाळ्यातही आकर्षक दिसतो. फोटोशूट, रिल्स आणि कौटुंबिक आठवणींसाठी हे ठिकाण बेस्ट.
गर्दीपासून दूर, स्वच्छ वातावरण, कमी आवाज आणि शांत हॉटेल्समुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे रिलॅक्सिंग डेस्टिनेशन.
हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान, कावळेसाद पॉइंट इथे छोटेखानी ट्रेक्स, फोटोग्राफी आणि निसर्ग निरीक्षणासाठी मस्त लोकेशन.
हॉटेल्समध्ये मिळणारे समुद्री खाद्य, सोलकढी, घावने, धिरडे, उकडीचे मोदक यांचा अनोखा आस्वाद ट्रिपला आणखी खास बनवतो.