Sameer Amunekar
कोकण म्हणजे निसर्गाची लेणी, हिरवाईने नटलेली डोंगररांगा, ओसंडून वाहणारे धबधबे, आणि मनाला शांती देणारी निसर्गरम्यता.
निसर्गाचा खरा अनुभव घ्यायचा असेल, तुम्हाला कोकणातील आंबोली या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यावी लागेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेलं हे थंड हवेचं ठिकाण म्हणजे कोकणातील एक गूढ आणि मोहक सौंदर्य असलेलं निसर्गरत्न.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही शांत आणि रम्य जागा पर्यटकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलंय.
पावसाळ्यात कोसळणारा आंबोली धबधबा पर्यटकांसाठी एक अप्रतिम अनुभव ठरतो.
तसंच कावळेसाद पॉईंट येथे घाटातलं काश्मीर’ असं म्हणावं इतकं अप्रतिम दृश्य दिसतं. धुक्याने भरलेल्या खोल दऱ्या आणि पर्वतरांगांच्या कुशीतून जाणारे रस्ते हे इथेच अनुभवायला मिळतात.