सातासमुद्रापारची फीलिंग कोकणात! सिंधुदुर्गातला 'हा' घाट देतोय स्वित्झर्लंडचा अनुभव, नक्की भेट द्या

Sameer Amunekar

धुक्याची चादर

सिंधुदुर्गातील आंबोली घाट आपल्या दाट धुक्यासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा संपूर्ण घाट धुक्यात हरवून जातो, ज्यामुळे पर्यटकांना स्वर्गात असल्याचा भास होतो.

Konkan Amboli Ghat Maharashtra tourism | Dainik Gomantak

अथांग आणि खोल दऱ्या

या घाटातील वळणावळणांच्या रस्त्यांवरून दिसणाऱ्या अथांग दऱ्या काळजाचा ठोका चुकवतात. हिरवाईने नटलेल्या या खोल दऱ्यांचे दृश्य अत्यंत विलोभनीय असते.

Konkan Amboli Ghat Maharashtra tourism | Dainik Gomantak

नागमोडी वळणांचा प्रवास

घाटातील वळणे चालकांसाठी एक आव्हान असली, तरी पर्यकांसाठी तो एक थरारक अनुभव असतो. प्रत्येक वळणावर निसर्गाचे एक नवे रूप पाहायला मिळते.

Konkan Amboli Ghat Maharashtra tourism | Dainik Gomantak

फेसाळणारे धबधबे

पावसाळ्यात आंबोली घाटात अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित होतात. मुख्य आंबोली धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे, जिथे लोक थंड पाण्याचा आनंद घेतात.

Konkan Amboli Ghat Maharashtra tourism | Dainik Gomantak

घनदाट निसर्ग संपदा

हे ठिकाण जैवविविधतेने नटलेले आहे. आजूबाजूला असलेली दाट जंगले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ पक्षी यामुळे निसर्गप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणीच असते.

Konkan Amboli Ghat Maharashtra tourism | Dainik Gomantak

थंड, आल्हाददायक वातावरण

समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यामुळे येथे वर्षभर हवामान थंड असते. गोव्याच्या उष्ण वातावरणातून येणाऱ्या पर्यटकांना या घाटातील थंडावा खूप सुखावह वाटतो.

Konkan Amboli Ghat Maharashtra tourism | Dainik Gomantak

गोव्याच्या सीमेवरील प्रमुख आकर्षण

गोवा आणि महाराष्ट्र यांना जोडणारा हा एक मुख्य दुवा आहे. गोव्यापासून काही तासांच्या अंतरावर असल्यामुळे विकेंड ट्रिपसाठी हे पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण बनले आहे.

Konkan Amboli Ghat Maharashtra tourism | Dainik Gomantak

चेहऱ्यावरची चमक कायम ठेवायचीय? 'हा' पांढरा पदार्थ लावून पाहा

Glowing Skin | Dainik Gomantak
येथे क्लिक करा