चेहऱ्यावरची चमक कायम ठेवायचीय? 'हा' पांढरा पदार्थ लावून पाहा, मिळेल इन्स्टंट ग्लो

Sameer Amunekar

नैसर्गिक क्लीन्सर

गुलाब जल त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण आणि जास्तीचे तेल काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि नैसर्गिकरित्या चमकू लागते.

Rose Water and Rice Flour for Face Glow | Dainik Gomantak

पीएच लेव्हल संतुलित राखते

त्वचेचा नैसर्गिक ओलावा आणि पीएच पातळी संतुलित ठेवण्याचे काम गुलाब जल करते. यामुळे त्वचा जास्त तेलकट किंवा जास्त कोरडी होत नाही.

Rose Water and Rice Flour for Face Glow | Dainik Gomantak

त्वचेला हायड्रेट ठेवते

दिवसभर कामाच्या ताणामुळे त्वचा निस्तेज दिसते. अशा वेळी गुलाब जल स्प्रे केल्यास त्वचेला झटपट ओलावा मिळतो आणि चेहरा फ्रेश दिसतो.

Rose Water and Rice Flour for Face Glow | Dainik Gomantak

अँटी-एजिंग गुणधर्म

वयाच्या चाळीशीत येणाऱ्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी गुलाब जल उपयुक्त ठरते. हे त्वचेला घट्ट ठेवण्यास मदत करते.

Rose Water and Rice Flour for Face Glow | Dainik Gomantak

डोळ्यांखालील सूज, काळी वर्तुळे

थकलेल्या डोळ्यांवर गुलाब जलामध्ये भिजवलेले कापसाचे बोळे ठेवल्यास डोळ्यांखालील सूज कमी होते आणि काळी वर्तुळे हळूहळू नाहीशी होतात.

Rose Water and Rice Flour for Face Glow | Dainik Gomantak

त्वचेची जळजळ कमी करते

उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे त्वचेची जळजळ होत असल्यास, गुलाब जल लावल्याने थंडावा मिळतो. यात दाहशामक गुणधर्म असतात.

Rose Water and Rice Flour for Face Glow | Dainik Gomantak

मेकअप रिमूव्हर म्हणून वापर

केमिकल असलेल्या रिमूव्हरपेक्षा गुलाब जल आणि खोबरेल तेलाचे मिश्रण एक उत्तम 'नॅचरल मेकअप रिमूव्हर' आहे. हे मेकअप काढताना त्वचेचे नुकसान होऊ देत नाही.

Rose Water and Rice Flour for Face Glow | Dainik Gomantak

रशियन पर्यटकांना वेड लावणारं कोकणातलं 'हे' ठिकाण तुम्हाला माहितीये का?

Shiroda Beach Konkan Secret Spot | Dainik Gomantak
येथे क्लिक करा