Manish Jadhav
स्वयंपाकघरातील औषधी मसाल्यांपासून ते भाज्यांपर्यंत आहारातील विविधता आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असते.
तुम्ही प्रोटीनने भरपूर काळे चणे खाल्लेत का? काळे चणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
काळ्या चण्याचे दोन प्रकार आहेत, ज्यातील एक म्हणजे देशी चणे आणि दुसरे काबुली चणे.
देशी काळ्या चण्यामध्ये उच्च फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. तुम्ही दररोज 3/4 कप चणे आहारात समाविष्ट केले पाहिजे.
काळ्या चण्यामधील कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
लोहाचा समृद्ध स्रोत म्हणून काळे चणे अशक्तपणाला प्रतिबंध करु शकतात.
काळ्या चण्यामधील विद्रव्य फायबर पित्त अॅसिड नियंत्रणात ठेवते आणि शरीराद्वारे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.