Sameer Amunekar
प्रवासाची हौस असते, पण बजेट आडवं येतं? मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे! भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फक्त काही हजारांमध्ये भन्नाट ट्रिप प्लॅन करू शकता.
जर समुद्रकिनाऱ्यांवर रिलॅक्स व्हायचं असेल, तर गोवा हे सर्वोत्तम ठिकाण. हॉटेल्स, होमस्टे, आणि हॉस्टेल्स अगदी 300-500 रुपयांपासून सुरू होतात. लोकल फूड (फिश करी-राईस) देखील स्वस्त दरात मिळतं. स्कूटी भाड्याने घेऊन साउथ आणि नॉर्थ गोवा फिरायला विसरू नका.
हंपी हे UNESCO वर्ल्ड हेरिटेज साइट असून इथे प्राचीन मंदिरे, वाडे आणि निसर्ग सौंदर्य एकत्र पाहायला मिळतं. ट्रेकिंग आणि सायकल सफारीसाठी प्रसिद्ध. हंपीमध्ये हॉटेल्स स्वस्तात मिळतात आणि बस किंवा ट्रेनने सहज पोहोचता येतं.
पुष्कर हे राजस्थानमधील एक शांत आणि रंगीबेरंगी शहर आहे. ब्रह्मा मंदिर, पुष्कर लेक आणि स्थानिक बाजार फिरणं खूपच रम्य वाटतं. येथे स्टे आणि फूड दोन्ही फार स्वस्तात मिळतं.
भारताचं सर्वात पवित्र शहर, वाराणसी हे एक अनोखा अनुभव देतं. गंगेच्या घाटांवर आरती, नौकाविहार, आणि गल्लीतील चविष्ट चहा-कचोरी हे सगळं फारच आकर्षक आहे. ट्रॅव्हलर्ससाठी हॉस्टेल्स, धर्मशाळा सहज उपलब्ध आहेत.
'God's Own Country' असं ओळखलं जाणारं केरळमधील अलेप्पी हे ठिकाण हाऊसबोट्ससाठी प्रसिद्ध आहे. स्वस्तात हाऊसबोट स्टे मिळतो आणि बॅकवॉटरमध्ये शांत सफर करता येते. स्थानिक जेवण आणि निसर्ग अनुभव फारच खास असतो.