Sameer Amunekar
सतत तणावाखाली राहणे मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी घातक असू शकते. मात्र, काही साध्या पण परिणामकारक सवयींमुळे तुम्हाला रिलॅक्स होण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.
रोज फक्त १० ते १५ मिनिटे शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. ही साधी क्रिया जरी वाटत असली तरी तिचा परिणाम आश्चर्यकारक असतो.
दररोज ३० मिनिटे चालणे, सायकलिंग, योगासने किंवा कोणताही आवडता शारीरिक व्यायाम केल्याने शरीरात एंडॉर्फिन नावाचं हॅपी हार्मोन स्रवू लागतं. हे हार्मोन नैराश्य, चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत करतं
दररोज ठराविक वेळेसाठी मोबाईल, लॅपटॉपपासून दूर रहा. सतत नोटिफिकेशन्स आणि स्क्रीन टाईममुळे मन अस्वस्थ राहतं.
एखादं आवडतं पुस्तक वाचा किंवा छंद जोपासा (जसं की संगीत, चित्रकला, बागकाम). मन ताजं राहतं आणि तणाव दूर होतो.
कॅमोमाइल, ग्रीन टी, किंवा तुळशी चहा मनाला शांत ठेवतो. हळूहळू पिणंही एकप्रकारे ध्यानासारखं असतं.