Akshata Chhatre
तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या चेहरा स्वच्छ असावा असं वाटतं का? मग काय कराल? सकाळी चेहरा धुतल्यानंतर तुरटी लावल्यास रात्री साचलेली घाण आणि तेल निघून जातं, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी वाटते.
तुरटीमध्ये असतात बॅक्टेरिया मारणारे घटक, जे त्वचेवरील जीवाणूंना नष्ट करून मुरुमांपासून संरक्षण करतात.
तुरटीचे पाणी लावल्याने त्वचेतील उघडी छिद्रं बंद होतात, ज्यामुळे त्वचा मुलायम होते.
स्वच्छ चेहऱ्यावर तुरटीचा तुकडा ओला करून हलक्या हाताने २ मिनिटं चेहऱ्यावर फिरवा किंवा त्याचं पाणी स्प्रे बाटलीत भरून फवारा.
तुरटी हा घरगुती, नैसर्गिक आणि किफायतशीर उपाय आहे, यासाठी महागड्या स्किनकेअर प्रोडक्ट्सची गरज नाही.
सकाळी फक्त ५ मिनिटं तुरटीसाठी द्या आणि तुमची त्वचा होईल चमकदार, स्वच्छ आणि निरोगी!