Glowing Skin: पार्लरची महागडी फेशिअल ट्रीटमेंट कशाला? कोरफड जेल लावण्याची 'ही' योग्य पद्धत ट्राय करा, मिळेल 'ग्लास स्किन'

Manish Jadhav

कोरफड जेलचा वापर

बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम रंगांचे किंवा सुगंधांचे जेल वापरण्याऐवजी शक्यतो वनस्पतीपासून ताजे कोरफड जेल काढा किंवा 100 टक्के प्युअर ब्रँडेड जेल वापरा. ताजे जेल त्वचेला कोणतेही साइड इफेक्ट न देता पोषण देते आणि नैसर्गिक चमक आणते.

Glowing Skin

डबल क्लिंजिंग

रात्री कोरफड चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुऊन घ्या. दिवसभर साचलेली धूळ, माती आणि मेकअप पूर्णपणे निघून गेला तरच कोरफडीमधील पोषक घटक त्वचेच्या आत मऊपणाने मुरु शकतात.

Glowing Skin | Dainik Gomantak

ग्लोइंग सीरम

फक्त कोरफड लावण्याऐवजी त्यात व्हिटॅमिन-ई कॅप्सूलचे तेल किंवा दोन थेंब बदामाचे तेल मिसळा. हे मिश्रण रात्री चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होतो आणि सकाळी चेहरा अतिशय तुकतुकीत दिसतो.

Glowing Skin

अंडर-आय जेल म्हणून वापर

रात्री झोपताना थोडे कोरफड जेल डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर हलक्या हाताने लावा. यामुळे डोळ्यांभोवतीच्या थकलेल्या पेशींना आराम मिळतो आणि सकाळी उठल्यावर डोळ्यांखाला आलेली सूज किंवा काळेपणा कमी होण्यास मदत होते.

Glowing Skin | Dainik Gomantak

स्लीपिंग मास्कसारखा वापर

रात्री चेहऱ्यावर स्पीलिंग मास्क लावून झोपी जा. हे जेल संपूर्ण रात्रभर त्वचेमध्ये ओलावा लॉक करुन ठेवते, ज्यामुळे सकाळी उठल्यावर काचेसारखी नितळ आणि हायड्रेटेड स्किन पाहायला मिळते.

Glowing Skin | Dainik Gomantak

पिंपल्स आणि डागांवर स्पॉट ट्रीटमेंट

चेहऱ्यावर मुरुम, पिंपल्स किंवा त्यांचे जुने डाग असतील तर रात्री झोपताना त्या विशिष्ट जागेवर कोरफड जेल आणि चिमूटभर कस्तुरी हळद किंवा टी-ट्री ऑइल मिक्स करुन लावा. सकाळी डाग हलके झालेली दिसतील आणि मुरुम सुकण्यास मदत होईल.

Glowing Skin | Dainik Gomantak

सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुणे

रात्रीभर त्वचेवर कोरफड जेल मुरु दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि चेहरा दिवसभर फ्रेश व टवटवीत राहतो.

Glowing Skin | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा