Manish Jadhav
उन्हाळ्यात आहाराबरोबर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी कोरफड बेस्ट पर्याय आहे.
कोरफड त्वचा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आज (27 एप्रिल) आपण उन्हाळ्यात कोरफडीचे काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत...
चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावल्याने त्वचा थंड होते. तसेच, कोरफडीत असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुम कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
तसेच, कोरफडीचा वापर त्वचेसोबतच केसांच्या काळजीसाठीही केला जातो.
कोरफड यकृत आणि मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.