Akshata Chhatre
पावसाळा आला की केस चिपचिपीत होतात, वास येतो, डल दिसतात आणि दुसऱ्याच दिवशी परत चिकट वाटतात.
या ओलसर हवामानात डँड्रफ, खाज येणं, स्कॅल्पवर बुरशी होणं अशा तक्रारी वाढतात.
बाजारातून मिळणारा किंवा घरच्या कुंडीतला ताजा एलोवेरा घ्या, मिक्सरमध्ये वाटून गंधहीन जेल तयार करा.
शॅम्पूनंतर हे जेल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत हलक्या हाताने ५ मिनिटं मसाज करा, ५ मिनिटं तसेच ठेवा.
नंतर फक्त पाण्याने धुऊन टाका कंडिशनरची गरज नाही. यामुळे केस लगेचच स्मूथ, सिल्की आणि चमकदार दिसतात.
केस दाट, फ्रीझ फ्री आणि व्यवस्थित वाटतात. अचानक बाहेर जायचं असलं तरी पटकन केस नीट दिसतात.