गोमन्तक डिजिटल टीम
जन्माने स्पॅनिश असलेले मानोलो मार्केझ हे माजी फुटबॉल खेळाडू तसेच व्यावसायिक फुटबॉल व्यवस्थापक आणि प्रशिक्षक आहेत.
बार्सिलोनात त्यांनी खेळाडू म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. यूए होर्टा, सीएफ बादालोना अशा अनेक संघांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
२८ व्या वर्षी त्यांनी खेळाडू म्हणून राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन क्षेत्राकडे आपली पावले वळवली.
२००२ साली त्यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहायला सुरुवात केली. पीबी अंग्वेरा संघासोबत त्यांनी या क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले.
सेगुंडा बी, लास पालमास ऍटलेटिको, क्रोएशियन इस्त्रा 1961या संघांसोबत त्यांनी व्यवस्थापक म्हणून काम केले.
३१ ऑगस्ट २०२० रोजी मार्केझ यांची इंडियन सुपर लीग क्लब हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. २८ मार्च २०२३ पर्यंत ते कार्यरत होते.
यानंतर त्यांनी २०२३-२४ हंगामासाठी एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. हा त्यांचा दुसरा हंगाम आहे.
20 जुलै 2024 रोजी मार्केझ यांची भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि इगोर स्टिमॅक यांच्या जागी ते नियुक्त झाले.
FC गोवाकडून खेळणारा 'सर्बियन' खेळाडू आहे तरी कोण?