Akshay Nirmale
गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा मंगळवारी पार पडला.
या समारोप सोहळ्यात बॉलीवुडमधील काही कलाकार सहभागी झाले होते. त्यात अभिनेत्री ईशा गुप्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
एरवी ईशा ही बऱ्याचदा बोल्ड अवतारात दिसून येते, पण इफ्फीच्या समारोप सोहळ्यात मात्र ती साडीमध्ये उपस्थित होती.
ईशा या सोहळ्यात गोल्डन कलरची साडी परिधान करून रेड कार्पेटवर अवतरली. आणि तिच्या एंट्रीनंतर सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या.
रेड कार्पेट पासून ते इफ्फी समारोप सोहळ्यापर्यंत ईशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ईशाची एकूण संपत्ती 66 कोटी रूपये इतकी आहे.
सध्या ईशा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये मनिष पॉल सोबत काम करत आहे.