MARCOS Commandos ची भुरळ

Ashutosh Masgaunde

कोण आहेत मार्कोस कमांडो?

भारतीय नौदलाच्या विशेष सागरी कमांडो युनिटला MARCOS म्हणून ओळखले जाते. हा शब्द मरीन आणि कमांडो मिळून बनला आहे.

Marcos Commando Indian Navy

मार्कोसची गरज का भासली?

1980 च्या सुमारास समुद्री चाच्यांची दहशत वाढत होती. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतरही लष्कराला विशेष दलाची गरज भासू लागली.

Marcos Commando Indian Navy

मार्कोसची निर्मिती

एप्रिल 1986 मध्ये नौदलाने विशेष दलाच्या निर्मितीसाठी नियोजन सुरू केले. सागरी कारवाई, छापे आणि दहशतवादविरोधी कारवाया करण्यास सक्षम असे सैनिक तयार करणे हा त्याचा उद्देश होता.

Marcos Commando Indian Navy

मार्कोसचे प्रशिक्षिण

MARCOS सैनिकांना अतिशय कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. यामध्ये साधारणपणे 20 वर्षे वयाच्या तरुणांनाच घेतले जाते.

Marcos Commando Indian Navy

मार्कोसची आतापर्यंतची ऑपरेशन्स

MARCOS 1987 मध्ये ऑपरेशन पवन, 1988 मध्ये ऑपरेशन कॅक्टस, 1991 मधील ऑपरेशन ताशा आणि कारगिल युद्धासह अनेक ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.

Marcos Commando Indian Navy

26/11 वेळी चर्चेत

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मार्कोसची खूप चर्चा झाली होती. ते आपत्तींच्या वेळी सैन्यासोबत काम करतात. जम्मू-काश्मीर पूर आणि केदारनाथ आपत्तीच्या वेळीही ते तैनात होते.

Marcos Commando Indian Navy

दोन दिवसात गोव्यात कुठे फिराल? शॉर्ट टूर प्लॅन

Goa Trip
अधिक पाहाण्यासाठी...