Konkan Tourism: मुंबईजवळचं 'परफेक्ट' रोमँटिक गेटवे! महाराष्ट्राच्या 'या' मिनी गोव्यात दडलाय कपलसाठी निसर्गरम्य स्वर्ग

Manish Jadhav

अलिबाग समुद्रकिनारा

महाराष्ट्राचे 'मिनी गोवा' म्हणून ओळखले जाणारे अलिबाग पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.

Alibaug Bach

अलिबागची ओळख

अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील एक सुंदर किनारपट्टीचे शहर आहे. नारळ-पोफळीच्या बागा, स्वच्छ समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांमुळे याला महाराष्ट्राचे 'मिनी गोवा' म्हटले जाते.

Alibaug Bach

पर्यटनासाठी मुख्य किनारे

अलिबागमध्ये अनेक प्रसिद्ध किनारे आहेत. यात अलिबाग बीच, वरसोली, नागाव, आक्षी आणि किहीम बीचचा समावेश होतो. नागाव बीच हा त्याच्या पांढऱ्या वाळूसाठी आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी विशेष प्रसिद्ध आहे.

Alibaug Bach

ऐतिहासिक कुलाबा किल्ला

समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असलेला 'कुलाबा किल्ला' हे अलिबागचे मुख्य आकर्षण आहे. ओहोटीच्या वेळी चालत किंवा घोडागाडीने या किल्ल्यापर्यंत जाता येते, जे पर्यटकांसाठी रोमांचक असते.

Alibaug Bach

सूर्यास्ताचा जादूई नजारा

अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरुन दिसणारा सूर्यास्त हा तुमच्या ट्रिपचा सर्वात सुंदर क्षण ठरु शकतो. हातामध्ये हात घालून समुद्राच्या लाटा पाहत सूर्यास्त अनुभवणे ही कपलसाठी एक अविस्मरणीय आठवण असते.

Alibaug Bach

समुद्रकिनारी कँडल लाईट डिनर

अलिबागमध्ये अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स समुद्रकिनारी कँडल लाईट डिनरची सोय करतात. ताज्या सीफूडचा आस्वाद घेत चांदण्यांच्या प्रकाशात जेवण्याचा अनुभव खूपच रोमँटिक असतो.

Alibaug Bach

साहसी वॉटर स्पोर्ट्स

जर तुम्हाला एडव्हेंचर आवडत असेल, तर नागाव बीचवर तुम्ही जोडीदारासोबत 'पॅरासेलिंग' किंवा 'जेट स्की'चा आनंद घेऊ शकता. एकत्र साहसी खेळ खेळल्याने ट्रिपमध्ये अधिक उत्साह येतो.

Alibaug Bach

सायकलिंग आणि लॉंग ड्राईव्ह

अलिबागच्या अरुंद आणि हिरव्यागार रस्त्यांवर सकाळी किंवा संध्याकाळी जोडीदारासोबत सायकलिंग करणे किंवा बाईकवरून लॉंग ड्राईव्हला जाणे हा एक वेगळाच आनंद देऊन जातो

Alibaug Bach

Konkan Tourism: कोकणचा स्वर्ग 'दिवेआगर'! निळाशार समुद्र पाहण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती

आणखी बघा