Akshata Chhatre
वर्षभरात सोनं खरेदी करण्याचे काही विशेष दिवस आहेत आणि यांपैकीच एक म्हणजे समृद्धीचं प्रतीक असलेला अक्षय तृतीयेचा दिवस.या दिवशी जर का तुम्ही सोनं विकत घेणार असाल तर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा.
सोन्याचे दर दररोज बदलतात. आधीच आपलं बजेट ठरवा आणि त्यानुसार खरेदी करा.
सोनं खरेदी करताना BIS हॉलमार्क असलेलं २२K किंवा २४K शुद्धतेचं सोनं घ्या.
दागिन्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे मेकिंग चार्जेस असतात. तुलना करा आणि योग्य निर्णय घ्या.
नाण्यांवर कमी खर्च येतो. डिजिटल गोल्ड हे सुरक्षित, सुलभ आणि सहज विकता येतं.
फसवणूक टाळण्यासाठी नामांकित दुकान किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरूनच खरेदी करा.