Manish Jadhav
सर्वाधिक आयक्यू असणारे लोक जगातील कोणत्या देशात राहतात हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग या वेबस्टोरीच्या माध्यमातून सर्वाधिक आयक्यू असणारे लोक कोणत्या देशात राहतात याबद्दल जाणून घेऊया...
सर्वात हुशार लोक कोणत्या देशात राहतात हे ठरवणे खूप कठीण आहे. कारण प्रत्येक संशोधनाचे सूत्र वेगळे असते. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूने नुकतीच अशा देशांची यादी जाहीर केली आहे जिथे लोकांचा आयक्यू लेवल सर्वात जास्त मोजला गेला आहे.
सर्वाधिक आयक्यू असणाऱ्या देशांच्या यादीत जपान पहिल्या क्रमांकावर आहे. येथील लोकांचा आयक्यू स्तर जगातील सर्वोच्च 106.49 आहे.
या यादीत तैवान दुसऱ्या स्थानावर आहे. येथील लोकांची सरासरी IQ लेवल 106.57 नोंदवली गेली.
जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक असलेल्या सिंगापूरचे लोक देखील खूप हुशार मानले जातात. येथील लोकांची सरासरी IQ लेवल 105.89 नोंदवली गेली आहे. हा देश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
105.37 च्या सरासरी IQ सह हाँगकाँग या यादीत चौथ्या स्थानी आहे. जे जागतिक आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून देखील ओळखले आहे.
104.1 च्या सरासरी IQ सह पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना पाचव्या स्थानी आहे. येथील लोक देशाचे इकॉनॉमीचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करतात.
102.35 च्या सरासरी IQ सह दक्षिण कोरिया सहाव्या स्थानी आहे. येथील लोक नवनवीन प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात.
भारत या यादीत 76.24 च्या सरसरीने 138 व्या स्थानी आहे.