Ajaigarh Fort: दगडांवरील नक्षी की जिवंत कला? ब्लॅक डायमंड 'अजयगड' चंदेल राजांचं शक्तीपीठ; ज्याला काळही हरवू शकला नाही

Manish Jadhav

अजयगड किल्ला

मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यात विंध्य पर्वतरांगेत वसलेला अजयगड किल्ला त्याच्या वास्तुकलेसह इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला मध्ययुगीन काळात चंदेल राजांचे प्रमुख केंद्र होता. चंदेल साम्राज्याच्या अस्तानंतरही या किल्ल्याचे महत्त्व कायम राहिले.

Ajaigarh Fort | Dainik Gomantak

भक्कम तटबंदी

विंध्य पर्वताच्या साधारण 600 फूट उंच टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. किल्ल्याची तटबंदी इतकी भक्कल आहे की, याला 'अजय' (ज्याला कोणीही जिंकू शकत नाही) असे नाव पडले.

Ajaigarh Fort | Dainik Gomantak

कातळ कोरीव मंदिरे

किल्ल्याच्या आत चंदेल काळातील अनेक सुंदर मंदिरे आहेत. या मंदिरांवरील नक्षीकाम आणि शिल्पकला खजुराहोच्या मंदिरांची आठवण करुन देते. येथील दगडी कोरीव काम अतिशय सुबक आहे

Ajaigarh Fort | Dainik Gomantak

अजयपाल महाराज मंदिर

किल्ल्याच्या माथ्यावर राजा अजयपाल यांचे मंदिर आहे. हे मंदिर स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे स्थान असून, गडावरील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे.

Ajaigarh Fort | Dainik Gomantak

पाण्याचे नियोजन

गडावर पाण्याचे उत्तम नियोजन पाहायला मिळते. येथे 'अजय पलका' नावाचा एक मोठा तलाव आहे, जो आजही गडावरील पाण्याच्या गरजा पूर्ण करतो. याशिवाय अनेक छोटी कुंडेही गडावर आढळतात.

Ajaigarh Fort | Dainik Gomantak

निसर्गरम्य दृश्य

अजयगड किल्ल्यावरुन केन नदीचे पात्र आणि आजूबाजूच्या घनदाट अरण्याचे विलोभनीय दृश्य दिसते. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Ajaigarh Fort | Dainik Gomantak

कसे पोहोचाल?

हा किल्ला मध्य प्रदेशातील पन्ना शहरापासून साधारण 34 किमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक खजुराहो (साधारण 80 किमी) आहे, जिथून टॅक्सीने अजयगडला पोहोचता येते.

Ajaigarh Fort | Dainik Gomantak

Gorakhgad Fort: 2137 फूट उंच अन् अंगावर शहारे आणणाऱ्या पायऱ्या, मुंबई-ठाण्याजवळचे ट्रेकर्सचे नंदनवन 'गोरखगड किल्ला'

Gorakhgad Fort | Dainik Gomantak
आणखी बघा