Shubham Tate
एअरटेलने पुन्हा एकदा ग्राहकांना धक्का दिला आहे. Airtel ने Amazon Prime Video सोबत येणाऱ्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत.
मात्र, हे बदल केवळ पोस्टपेड प्लॅनसाठी करण्यात आले आहेत. हे सर्वप्रथम TelecomTalk ने कळवले होते.Dainik Gomantak
कंपनी हे सबस्क्रिप्शन Rs 499, Rs 999, Rs 1199 आणि Rs 1599 मध्ये देते, पण आता प्राइम व्हिडिओ सब्सक्रिप्शनची वैधता 1 वर्षावरून 6 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
या चार पोस्टपेड योजना 1 वर्षाच्या Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह देखील येतात. याशिवाय इतर फायदेही यामध्ये देण्यात आले आहेत. एअरटेल टोटल पाच प्रीपेड योजना ऑफर करते. यामध्ये 399 रुपये, 499 रुपये, 999 रुपये, 1199 रुपये आणि 1599 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.
एअरटेलच्या बेसिक पोस्टपेड प्लानची किंमत 399 रुपये आहे. यामध्ये, अमर्यादित कॉलसह 40GB मासिक डेटासह 200GB रोलओव्हर डेटा दिला जातो.
एअरटेलचा महागडा पोस्टपेड प्लान 1599 रुपयांचा आहे. यामध्ये 200GB रोलओव्हर डेटासह अमर्यादित कॉल आणि 250GB मासिक डेटा दिला जातो.
याशिवाय Amazon प्राइम मेंबरशिपचे सबस्क्रिप्शनही 6 महिन्यांसाठी दिले जाते. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. या प्लॅनसह, Disney + Hotstar चे 1 वर्षाचे सबस्क्रिप्शन, Wynk आणि Shaw academy मध्ये प्रवेश देखील दिला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.