Sameer Panditrao
हवेत वाढणारे सूक्ष्म प्रदूषक कण फक्त श्वसनाच्या आजारांनाच कारणीभूत नसतात, तर ते आपल्या भावनांवर, मूडवर आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करतात.
PM2.5 आणि नायट्रोजन डायऑक्साइडसारखे घटक मेंदूपर्यंत पोहोचतात. ते न्यूरॉन्सवर परिणाम करून ताण, चिडचिड आणि चिंता वाढवतात.
संशोधनात दिसून आले आहे की प्रदूषित शहरांमध्ये राहणाऱ्यांना नैराश्य आणि मूड स्विंग्सचा धोका जास्त असतो.
हवाप्रदूषणामुळे श्वसन त्रास आणि डोकेदुखी वाढतात, ज्यामुळे झोपेचा दर्जा कमी होतो आणि दिवसभर थकवा जाणवतो.
प्रदूषित वातावरणात वाढणाऱ्या मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव, चिडचिड आणि शिकण्यात अडचणी दिसतात.
प्रदूषणामुळे डोपामिन आणि सेरोटोनिनसारख्या ‘हॅप्पी हार्मोन्स’चे प्रमाण कमी होते, ज्यामुळे मनःस्थिती खालावते.
घरात एअर प्युरिफायर वापरा, झाडे लावा, सकाळी स्वच्छ हवेत व्यायाम करा आणि मास्कचा वापर करा — मन आणि शरीर दोन्ही निरोगी ठेवा.