Ahilya Fort: दगडावर कोरलेलं मराठा शौर्य! अद्भुत वास्तुकलेचं घडतं दर्शन; नर्मदेच्या तिरावर वसलेला 'अहिल्या किल्ला' घालतो साद

Manish Jadhav

अहिल्या किल्ला

मध्यप्रदेशातील अहिल्या किल्ला हा त्याच्या शांतता आणि वास्तुकलेसाठी जगप्रसिद्ध आहे.

Ahilya Fort | Dainik Gomantak

अहिल्यादेवींचे निवासस्थान!

नर्मदा नदीच्या काठी वसलेला हा किल्ला 18व्या शतकात मराठा साम्राज्याच्या महान शासिका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला होता. हे ठिकाण त्यांच्या साधेपणाचे आणि कर्तृत्वाचे जिवंत प्रतीक आहे.

Ahilya Fort | Dainik Gomantak

नर्मदेचा विलोभनीय घाट

किल्ल्याच्या पायथ्याशी नर्मदा नदीचा विस्तीर्ण आणि भव्य घाट आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरुन नर्मदा नदीचे आणि स्नानासाठी येणाऱ्या भाविकांचे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते.

Ahilya Fort | Dainik Gomantak

अदभुत वास्तुकला आणि कोरीवकाम

या किल्ल्याची वास्तुकला मराठा आणि माळवा शैलीचा संगम आहे. किल्ल्याच्या भिंती, खिडक्या आणि दरवाजांवरील हत्ती, घोडे आणि पौराणिक कथांचे कोरीवकाम पाहून पर्यटक थक्क होतात.

Ahilya Fort | Dainik Gomantak

राजगादी आणि अहिल्यादेवींचे मंदिर

किल्ल्याच्या आत अहिल्यादेवींची 'राजगादी' आणि त्यांचे वैयक्तिक मंदिर आहे. येथे राजमाता न्यायदान करायच्या. आजही हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते आणि तिथे अहिल्यादेवींची एक मूर्ती स्थापन केलेली आहे.

Ahilya Fort | Dainik Gomantak

जागतिक कीर्तीच्या 'महेश्वरी साड्या'

अहिल्यादेवींनी विणकाम उद्योगाला चालना देण्यासाठी कारागिरांना येथे बोलावले होते. आजही किल्ल्याच्या परिसरात महेश्वरी साड्या विणल्या जातात. या साड्यांच्या पदरावरील नक्षीकाम किल्ल्याच्या कोरीवकामातूनच प्रेरित आहे.

Ahilya Fort | Dainik Gomantak

बॉलिवूडचे आकर्षण!

या किल्ल्याचे सौंदर्य इतके अतुलनीय आहे की, 'बाहुबली', 'कलंक', आणि 'पॅडमॅन' सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे चित्रीकरण या किल्ल्याच्या परिसरात झाले आहे.

Ahilya Fort | Dainik Gomantak

आध्यात्मिक आणि शांत वातावरण

इतर किल्ल्यांप्रमाणे येथे केवळ युद्धकथा नाहीत, तर एक प्रकारची आध्यात्मिक शांतता आहे. संध्याकाळी होणारी 'नर्मदा आरती' आणि दीपमाळांचे दृश्य पर्यटकांच्या स्मरणात कायमचे घर करते.

Ahilya Fort | Dainik Gomantak

Belapur Fort: नवी मुंबईचा 'रॉयल' वारसा अन् चिमाजी अप्पांचा 'तो' ऐतिहासिक विजय... 500 वर्षांचा बेलापूर किल्ल्याचा धगधगता इतिहास

आणखी बघा