Fort History: औरंगजेबाचा दरबार अन् शिवरायांचा स्वाभिमान; मराठ्यांनी गाजवला 'हा' किल्ला!

Manish Jadhav

आग्रा किल्ला

आग्रा किल्ला हे युनेस्कोने घोषित केलेले जागतिक वारसा स्थळ आहे. यमुनेच्या काठी वसलेला हा किल्ला लाल वाळूच्या दगडांनी बनलेला असल्याने याला 'लाल किल्ला' असेही म्हटले जाते.

Agra Fort | Dainik Gomantak

महाराजांचा आग्रा भेटीचा प्रसंग

मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात थरारक प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट आणि नजरकैदेतून सुटका. 1666 मध्ये महाराज औरंगजेबाला भेटण्यासाठी याच किल्ल्यावर आले होते, जिथे त्यांचा अपमान करण्यात आला होता.

Agra Fort | Dainik Gomantak

आग्रा किल्ल्यातून सुटका

नजरकैदेत असताना महाराजांनी आपली सुटका करुन घेण्यासाठी मिठाईच्या पेट्यांचा वापर केला. जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी पलायन योजना याच किल्ल्याच्या परिसरातून पार पडली होती.

Agra Fort | Dainik Gomantak

किल्ल्याची भव्य रचना

हा किल्ला 94 एकर परिसरात पसरलेला आहे. याला 70 फूट उंच तटबंदी असून किल्ल्याभोवती संरक्षणासाठी मोठी खांदक (Moat) आहे, ज्यात एकेकाळी मगरी सोडल्या जात असत.

Agra Fort | Dainik Gomantak

किल्ल्याचे मुख्य दरवाजे

आग्रा किल्ल्याला चार मुख्य दरवाजे आहेत, त्यापैकी 'अमरसिंग दरवाजा' हा पर्यटकांसाठी खुला असलेला मुख्य दरवाजा आहे. याशिवाय, 'दिल्ली दरवाजा' हा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो.

Agra Fort | Dainik Gomantak

किल्ल्यातील महाल

किल्ल्याच्या आत जहांगीर महाल, खास महाल, मुसम्मन बुर्ज आणि शीश महाल यांसारख्या भव्य वास्तू आहेत. मुसम्मन बुर्ज हे तेच ठिकाण आहे जिथून शहाजहान आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ताजमहाल पाहत असे.

Agra Fort | Dainik Gomantak

दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास

मुघल काळात जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी 'दिवाण-ए-आम' आणि खास मंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी 'दिवाण-ए-खास' या सभागृहांचा वापर केला जात असे. येथील कोरीव काम आजही थक्क करणारे आहे.

Agra Fort | Dainik Gomantak

मराठ्यांचे वर्चस्व

केवळ मुघलच नव्हे, तर 18व्या शतकात या किल्ल्यावर मराठ्यांचे वर्चस्व होते. महादजी शिंदे यांनी 1785 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला होता आणि अनेक वर्षे तो मराठ्यांच्या ताब्यात होता.

Agra Fort | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

Chapora Fort | Dainik Gomantak
आणखी बघा