Kagiso Rabada: रबाडाचा अंदाजच न्यारा; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू

Manish Jadhav

कगिसो रबाडा

क्रिकेटमध्ये इतिहास घडवण्यासाठी एक चेंडू देखील पुरेसा असतो, असे म्हणतात. पण, SA20 मध्ये कागिसो रबाडाने 2 षटकांत इतिहास रचला.

Kagiso Rabada | Dainik Gomantak

कोणालाच जमलं नाही

त्या 2 षटकांमध्ये त्याने जे केले ते SA20 च्या इतिहासात कधीही एखाद्या गोलंदाजाने केले नाही. रबाडाचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले गेले.

Kagiso Rabada | Dainik Gomantak

अद्भुत कामगिरी

मुंबई इंडियन्स केपटाऊन आणि पार्ल रॉयल्स यांच्यातील सामन्यात रबाडाची अद्भुत कामगिरी दिसून आली. या सामन्यात, रबाडा मुंबई इंडियन्स केपटाऊनकडून खेळला, ज्याने त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर हा सामना 33 धावांनी जिंकला.

Kagiso Rabada | Dainik Gomantak

पहिला खेळाडू ठरला

पार्ल रॉयल्सविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये रबाडाने सलग 2 मेडन ओव्हर्स टाकले आणि 2 विकेट्सही घेतल्या. अशाप्रकारे, तो SA20 मध्ये पॉवरप्लेमध्ये सलग दोन मेडन ओव्हर्स टाकणारा पहिला गोलंदाज बनला.

Kagiso Rabada | Dainik Gomantak

गुजरात टायटन्स

SA20 मधील रबाडाच्या कामगिरीकडे पाहता असे दिसते की, आयपीएल 2025 साठी गुजरात टायटन्सने त्याच्यावर 10.75 कोटी विनाकारण खर्च केले नाहीत.

Kagiso Rabada | Dainik Gomantak

सोपं काम होणार

रबाडाने आयपीएल 2025 मध्येही अशीच कामगिरी केली तर शुभमन गिलचे काम सोपे होऊ शकते.

Kagiso Rabada | Dainik Gomantak
आणखी बघा