Afzal Khan: 63 बायका, एक विहीर आणि क्रूर अंत: अफजल खानाच्या सैतानी कृत्याची धडकी भरवणारी कहाणी

Manish Jadhav

विजापूरमधील धडक भरवणार ठिकाण

कर्नाटकातील विजापूरमध्ये एका निर्जन ठिकाणी 7 रांगांमध्ये 63 थडगी आहेत. हे ठिकाण 'साठ कब्र' नावाने ओळखले जाते, जे एका भीषण गुन्ह्याचा पुरावा आहे.

afzal khan | Dainik Gomantak

अफजल खानाची क्रूरता

ही थडगी कोणत्याही युद्धातील सैनिकांची नाहीत, तर ती आदिलशाहीचा क्रूर सेनापती अफजल खानाच्या 63 पत्नींची आहेत.

afzal khan | Dainik Gomantak

ज्योतिषाची 'ती' भविष्यवाणी

1659 मध्ये शिवाजी महाराजांवर चालून जाण्यापूर्वी ज्योतिष्यांनी भाकीत केले होते की, अफजल खान या युद्धातून जिवंत परतणार नाही. या भीतीमुळे खानाने विजापूर सोडण्यापूर्वीच आपली कबर तयार केली होती.

afzal khan | Dainik Gomantak

संशय आणि भीतीचा अंत

आपल्या मृत्यूनंतर आपल्या पत्नींनी दुसऱ्या कोणाशी लग्न करु नये किंवा त्या कोणाच्या हाती लागू नयेत, या संशयी विचाराने त्याने सर्वांना मारण्याचा भयानक निर्णय घेतला.

afzal khan | Dainik Gomantak

विहिरीत ढकलून हत्या

खानाने आपल्या 63 पत्नींना विजापूरमधील एका विहिरीत एक-एक करुन ढकलले आणि पाण्यात बुडवून त्यांची निर्घृण हत्या केली.

afzal khan | Dainik Gomantak

पळण्याचा अयशस्वी प्रयत्न

जेव्हा एक पत्नी जीव वाचवण्यासाठी पळू लागली, तेव्हा तिलाही पकडून क्रूरपणे मारण्यात आले. या सर्व महिलांना एकाच ठिकाणी दफन करण्यात आले.

afzal khan | Dainik Gomantak

एक रिकामी कबर

या ठिकाणी 63 थडग्यांसोबत एक कबर आजही रिकामी आहे. असे मानले जाते की, कदाचित ती वाचलेल्या महिलेसाठी किंवा खानासाठी असावी.

afzal khan | Dainik Gomantak

ईश्वरी न्याय आणि शेवट

आपल्या पत्नींची कबर स्वतः बांधणाऱ्या खानाची शेवटची इच्छा होती की त्यालाही तिथेच दफन करावे. पण प्रतापगडावर महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि त्याचे थडगे तिथेच राहिले.

afzal khan | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

आणखी बघा