'कांतारा 2'च्या टीझरनंतर रिषब शेट्टी थेट 'इफ्फी'च्या रेड कार्पेटवर...

Akshay Nirmale

रिषब शेट्टी

गोव्यात 54 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा समारोप झाला आहे. त्यात अखेरच्या दिवशी अभिनेता रिषब शेट्टी भाव खाऊन गेला.

Rishab Shetty | Instagram

कांतारा

गतवर्षी आलेल्या अभिनेता-दिग्दर्शक रिषब शेट्टीच्या कांतारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आणि नवीन बनवले.

Rishab Shetty | Instagram

इफ्फीत कांतारा

या वर्षी इफ्फीमध्ये अखेरच्या दिवशी कांतारा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता रिषब शेट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने इफ्फीत आला.

Rishab Shetty | Instagram

पारंपरिक लूक

रेड कार्पेटवर त्याचे जल्लोषी स्वागत झाले. यावेळी त्याने ब्लॅक शर्ट आणि पांढरी लुंगी असा वेश परिधान केला होता.

Rishab Shetty | Instagram

कांतारा 2 चा टीझर

काही दिवसांपुर्वीच कांतारा 2 चा टिझर रीलीज करण्यात आला होता. त्यामुळे त्या चित्रपटाची उत्सुकता असताना इफ्फीमध्ये रिषब सहभागी झाला होता.

Rishab Shetty | Instagram

कांतारा चा प्रीक्वेल

कांतारा 2 च्या टीझरवरून हा मूळ चित्रपटाचा प्रीक्वेल असावा असे वाटते.

Rishab Shetty | Instagram

तिसरा पार्टही येणार

टीझरमध्ये चित्रपटाचे नाव कांतारा चॅप्टर 1 असे दिले आहे. त्यामुळे कांतारा चॅप्टर 2 पण येणार असल्याची चर्चा आहे.

Rishab Shetty | Instagram
What is Deep Fake content | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...