Akshata Chhatre
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचं व्यवस्थित वाढणं आणि स्थिर होणं हे फार महत्त्वाचं असतं.
गर्भधारणा लक्षात आल्यावर लगेच स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. आवश्यक तपासण्या वेळेवर करणे महत्त्वाचे.
गर्भधारणेपूर्वी किंवा शक्य तितक्या लवकर फॉलिक अॅसिड सुरू करा हे बाळाच्या मेंदू व मेरुरज्जूच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे.
हिरव्या भाज्या, फळं, धान्यं आणि प्रोटीनयुक्त अन्न खा. जंक फूड, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स यांपासून दूर रहा.
हायड्रेशनमुळे गर्भाशयातील रक्तप्रवाह सुधारतो आणि उष्णताज्वर, थकवा कमी होतो.
अंमली पदार्थ, सिगरेट, दारू, अनावश्यक प्रवास,शरीरसंबंध, रासायनिक उत्पादने, कीटकनाशके हे नक्की टाळा.