Akshata Chhatre
प्रोटीनची कमतरता, ताणतणाव, हिट स्टाईलिंग आणि प्रदूषणा मुळे केसांची मुळे कमकुवत होऊन हेअर फॉल वाढतो.
हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला हवे आहे- खोबरेल तेल, रोजमेरीची पाने आणि एरंडेल तेल.
एका भांड्यात पाणी गरम करून त्यात दुसऱ्या वाटीत खोबरेल तेल आणि रोजमेरी पाने टाका. २०-२५ मिनिटे मंद आचेवर हे तेल गरम होऊ द्या.
तयार तेल गाळून घ्या आणि त्यात एरंडेल तेल मिसळा. आठवड्यातून किमान दोनदा या तेलाने टाळूवर हलक्या हाताने मसाज करा.
खोबरेल तेल केसांच्या आतपर्यंत जाऊन पोषण देते. यामुळे केस मऊ, चमकदार होतात आणि केसांमधील कोरडेपणा दूर होतो.
रोजमेरीमुळे डोक्यातील रक्ताभिसरण वाढून नवीन केस उगवतात, तर कॅस्टर ऑईल केसांचा दाटपणा वाढवण्यास मदत करते.
केमिकल उत्पादनांवर अवलंबून राहण्यापेक्षा हा नैसर्गिक उपाय दीर्घकाळ टिकणारे परिणाम देतो. आजच हे तेल बनवा आणि केसांचे सौंदर्य जपा!