Manish Jadhav
आजच्या धकाधकीच्या काळात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. आपल्या दैनंदिन आयुष्यात सकाळचा काळ हा सर्वात मौल्यवान असतो.
जर सकाळ सकारात्मक आणि आरोग्यदायी सवयींनी भरलेली असेल, तर शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यालाही त्याचा फायदा होतो.
आज (15 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून सकाळी उठल्यानंतर कोणत्या सवयी आंगिकारल्या पाहिजेत याविषयी जाणून घेणार आहोत...
सकाळी उपाशीपोटी तांब्याच्या भांड्यातून पामी प्यायल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.
सकाळी केलेला व्यायाम संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा प्रदान करतो. योगासने, प्राणायाम शरीराला ताजेतवाने ठेवतात.
कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यास पचनसंस्था उत्तम राहते.
वरील सवयींचा अवलंब केल्यास शरीराला केवळ बाह्य नव्हे तर अंतर्गत स्तरावरही फायदे होतात.