Akshata Chhatre
महागडे स्पा किंवा डिटॉक्स ट्रीटमेंट न घेता शरीराची शुद्धी करण्याची सोपी व पारंपरिक पद्धत आजही गावाकडे जपली जाते.
या आदिवासी पद्धतीत फक्त घरच्या घरी बनवलेले डिटॉक्स वॉटर सात दिवस वापरायचे असते.
यासाठी एका बादलीत गरम पाणी घेऊन त्यात एक चिमूट हळद, थोडी तुरटी, स्वच्छ धुतलेली दोन-चार कडूनिंबाची पानं आणि एक चमचा मीठ टाकून पाणी दहा मिनिटे ठेवावे.
त्यानंतर या पाण्याने आंघोळ करून शरीर नीट घासावे.
मीठ नैसर्गिक स्क्रबचे काम करून त्वचेवरील घाण काढते, तर नीम आणि हळदीचे जंतुनाशक गुणधर्म त्वचेवरील खाज, पुरळ आणि संसर्गापासून बचाव करतात.
ही पद्धत पावसाळ्यातील ओलावा व संसर्गजन्य त्वचा समस्यांवर विशेष प्रभावी ठरते आणि मुलांनाही सुरक्षितपणे वापरता येते.
सात दिवस नियमित वापरल्यास त्वचा स्वच्छ, तजेलदार व निरोगी होते, रोमछिद्र स्वच्छ होतात आणि नैसर्गिक उजळपणा मिळतो.