Akshata Chhatre
आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे, मात्र सध्या रश्मिका मंदाना छावा या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
चला मग आज पाहूया रश्मिका शिवाय आणखीन कुठल्या अभिनेत्रींनी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे..
काही दिवसांपूर्वी आलेल्या धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटात अमृता खानविलकर हिने महाराणींची भूमिका साकारली होती.
अमृता खानविलकर हिच्याशिवाय सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात मराठी अभिनेत्री रेवती लिमये हिने महाराणींची भूमिका निभावली होती.
शिवरायांचा छावा या चित्रपटात तृप्ती तोरडमल या अभिनेत्रीने येसूबाईंची भूमिका साकारली होती.
मात्र अजूनही मराठी टीव्हीवर प्राजक्ता गायकवाड हिने साकारलेली भूमिका प्रत्येकाच्या मनात आहे.
प्राजक्ताने साकारलेल्या या भूमिकेनेच तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती.