ऐतिहासिक महाभारतात जुहीचा हा रोल थोडक्यात हुकला

गोमन्तक डिजिटल टीम

90 च्या दशकातली ड्रीम गर्ल

अभिनेत्री जूही चावला ही 90 च्या दशकातल्या तरुणांसाठी ड्रीम गर्ल होती. जूहीने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांना तिच्यावर प्रेम करायला भाग पाडलं होतं.

जूही आणि महाभारत

जूहीचा रामानंद सागर यांच्या गाजलेल्या महाभारत या सिरीयलशी असणारा हा संबंध तुम्हाला माहितेय का?

Juhi Chawla | Dainik Gomantak

जूहीने एका मुलाखतीत एका खुलासा

तुम्हाला माहित आहे का की द्रौपदीच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम बी.आर. चोप्राने जुही चावलाशी संपर्क साधला का? चुहीने एका जुन्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता आणि संपूर्ण घटना सांगितली होती.

जूही म्हणाली

जुही चावलाने खुलासा केला होता की, बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत' या टीव्ही शोकरिता तिने द्रौपदीच्या भूमिकेसाठी स्क्रीन टेस्ट दिली होती आणि तिला ही भूमिका मिळाली होती.

द्रौपदीसाठी निवड पण...

जूही म्हणाली महाभारत'मधील द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्यांनी माझी स्क्रीन टेस्ट घेतली आणि प्रत्यक्षात माझी निवड केली. मग, जेव्हा मी 'कयामत से कयामत तक' साइन केले तेव्हा चोप्रा यांनी मला सांगितले, हा (माझा शो) करू नका. तुमचा चित्रपट बनत असेल तर तिथे काम करा.

जूहीने सल्ला ऐकला

चित्रपट आणि मालिका एकत्र आल्या असताना काय करावे हे जूहीला कळत नव्हते पण तिने बी.आर चोप्रा यांचा सल्ला ऐकला आणि तो योग्य ठरलाही.

परिणाम काय असता?

जर जूहीने बी आर चोप्रा यांचा सल्ला ऐकता मालिकेत काम केले असते तर आज तिचे करिअर पूर्णत: वेगळे दिसले असते.

चित्रपटाचे यश

महाभारत सोडल्यानंतर जूहीने आमिर खानसोबत तिचा पहिला चित्रपट केला जो होता 'कयामत से कयामत तक' या चित्रपटानंतर आमिर खान आणि जूही चावला यांच्या करिअरला वेगळे वळण मिळाले.

श्रद्धाने प्रियांकाला याबाबतीत टाकले मागे...

अधिक पाहण्यासाठी