Pramod Yadav
अभिनेत्री अदा शर्माने अलिकडेच दक्षिण गोव्यातील बिग फूट संग्रहालयाला भेट दिली.
गेल्या काही दिवसांपूर्वी खराब हवामानाचा विमानसेवेला फटका बसला यामुळे अनेक उड्डाणे विलंबाने झाली.
अदा शर्माच्या प्रवासावर देखील याचा परिणाम झाला पण तिचे मिळालेल्या वेळेचे सदुपयोग केला.
अदाने लोटली येथील बिग फूट संग्रहालयाला भेट देत छान वेळ घालवला.
अदाने संग्रहालयातून काही फोटो शेअर केले आहेत.
सासष्टी तालुक्यातील लोटली गावात असणारे हे संग्रहालय एक थीम पार्क असून खूप प्रसिद्ध आहे.
त्यापूर्वी अदाला पणजीत भेटलेल्या एका चाहत्याने अदाचे सूंदर स्केच भेट दिले.