Akshay Nirmale
टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेता अर्जून बिजलानी त्याची पत्नी नेहा स्वामी-बिजलानी हिच्यासमवेत न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गोव्यात आला आहे.
अर्जून आणि नेहा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सूर्यास्ताचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही पाठमोरे दिसतात.
अर्जूनने यापुर्वीच तो न्यू ईयरसाठी फॅमिलीसह यंदा गोव्याला जाणार असल्याचे सांगितले होते.
नवीन वर्षाची सुरवात अर्जून पत्नीसह गोव्यातून करत आहे. पाच दिवस अर्जूनचा गोव्यात मुक्काम असणार आहे.
कुटूंबासमवेत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असून गोव्यातील वातावरण त्यासाठी खास आहे. बॅक टू बॅक शूटिंगनंतर असे व्हेकेशन गरजेचे असते, असे अर्जूनने म्हटले होते.
गोव्यातील सकारात्मक उर्जेसह नवीन वर्षाचे स्वागत करणे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच या ट्रीपची खूप उत्सुकता असल्याचे अर्जूनने म्हटले होते.
अर्जूनकडे एकूण 41 कोटी रूपये इतकी संपत्ती आहे.