Manish Jadhav
29 ऑक्टोबरपासून 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मनुका ओव्हल (कॅनबरा) येथे होणार आहे.
दोन्ही संघ 2026 च्या टी20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी या मालिकेचा उपयोग करतील.
आशिया कप 2025 मध्ये शानदार कामगिरीनंतर डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अभिषेक शर्माने आतापर्यंत 24 सामन्यांत 849 धावा केल्या आहेत, त्याला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 151 धावांची गरज आहे.
जर अभिषेकने पुढील तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 151 धावा केल्या, तर तो विराट कोहलीचा विक्रम मोडेल.
सध्या सर्वात कमी (27) इनिंगमध्ये 1000 टी20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा भारतीय विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
अभिषेकने एशिया कपमध्ये 6 इनिंगमध्ये सुमारे 44 च्या सरासरीने आणि 200 च्या स्ट्राइक रेटने 314 धावा केल्या होत्या.
2025 मध्ये अभिषेकने 12 इनिंगमध्ये 593 धावा (जवळपास 50 ची सरासरी) केल्या आहेत, ज्यात 41 षटकार आणि 56 चौकारांसह त्याचा स्ट्राइक रेट 200+ आहे.