Sameer Amunekar
भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारतीय संघानं 7 विकेट्सनं जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात भारतीय संघाला 133 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं, जे त्यांनी अभिषेक शर्माच्या 79 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर केवळ 12.5 षटकांत पूर्ण केलं.
या खेळीसह अभिषेकनं शर्मानं युवराज सिंगचा 18 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. अभिषेकनं त्याच्या खेळीदरम्यान फक्त 34 चेंडूंचा सामना केला आणि एकूण 8 षटकारही मारले.
भारतीय संघाकडून इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. त्यानं 2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 7 षटकार मारले होते.
अभिषेक शर्मानं इंग्लंडविरुद्ध भारतासाठी T20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनण्याचा त्याचा 18 वर्षांचा जुना विक्रम मोडला. त्यानं या सामन्यात 8 षटकार मारले.
अभिषेकनं त्याच्या डावात 232.35 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. आता तो युवराज सिंगसह घरच्या मैदानावर भारतासाठी सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा तिसरा खेळाडू बनला आहे.